Bigg-Boss-Marathi-Season-3-contestants-list

Bigg Boss Marathi Season 3 Contestants List with Photo and Details

Bigg Boss Marathi Season 3 Contestants List with Details:: एकाच घरात शंभर दिवस संपूर्ण जगाशी संपर्क तोडून राहिलेले 15 स्पर्धक, त्यांच्यातील स्पर्धा, भांडण, ड्रामा हे सर्व दाखवणारा सर्वांचा लाडका रियालिटी शो बिग बॉस मराठी सीजन 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर

Advertisement
यांनी सोशल मीडियावर बिग बॉस मराठी सीजन 3 चे प्रोमोशन करत घोषणा केली.

या वेळेचा बिग बॉस मराठी सीजन 3 चा डोळा काहीसा रोबोटिक थीममध्ये रंगवलाय. महेश मांजरेकर यांनी यावेळी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी त्याच्या सोबत मी परत येतोय तुम्ही तयार राहा बिग बॉस मराठी सीजन 3 लवकरच कलर्स मराठी वर अशी कॅप्शन दिले आहे. या प्रोमो मुळे बिग बॉस मराठी चे चाहते खुश असतील हे नक्की. कलर्स मराठी बिग बॉस सीजन 1 आणि 2 पर्व खूप गाजलं. त्यामुळे सीजन 3 मध्ये कोण असणार, स्पर्धा कशी रंगणार, अशी सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. हा सर्व मराठी प्रेक्षक वर्गाचा आवडता रियालिटी शो आहे आणि लवकरच कलर्स वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Table of Contents

Bigg Boss Marathi Season 3 Updates

बिग बॉस मराठी ची पहिली दोन पर्व खूप गाजली. अभिनेत्री मेघा धाडे ने या शोच्या पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावलं तसेच शिव ठाकरे याने आपल्या निरागस पणामुळे आणि अभिनेत्री विना जगताप सोबत रोमान्स करत दुसऱ्या पर्वाचे विजेते पद पटकावले. आता बिग बॉस मराठी 3 पर्व कसं असणार? काय असणार? शो कसा रंगणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेत.

बिग बॉस मराठी चा दुसरा पर्व स्पर्धे सोबत त्यातील भांडणांमुळे सुधा खूप चर्चेचा विषय बनला. शिवानी सुर्वे, अभिजित बीचुकले, विना जगताप शेवटपर्यंत चर्चेत राहिले. त्यामुळे यंदाच्या पर्वात कोण कलाकार सहभागी होणार, बिग बॉसच्या घरात नवीन कोणता ड्रामा घडणार याबाबत सर्वच उत्सुक आहेत. बिग बॉस मराठी पर्व 3 पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक असलाच आणि आपल्या मनात देखील या पर्वात कोण सहभागी होणार याची उत्सुकता असणारच.

Bigg Boss Marathi Season 3 Start Date

बिग बॉस मराठी सीजन 3 ग्रॅड प्रीमिअर भारतीय मानक वेळानुसार 15 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 7.00 वाजता कलर्स मराठी या वाहिनीवर प्रक्षेपित केली गेली. आपण ही मालिका Voot या अप्प वर देखील पाहू शकता. बिग बॉस मराठी च्या इतर दोन सीजन प्रमाणे आताच्या सीजन मध्ये देखील आपल्याला टोटल 18 सदस्य पाहायला मिळणार आहेत.

Bigg Boss Marathi Season 3 Shooting Location

कलर्स मराठीचा बिग बॉस मराठी सीजन 1 हा महाराष्ट्रातील लोणावळा येथे शूट करण्यात आला होता. त्याच प्रमाणे बिग बॉस मराठी सीजन 2 ची शुटींग हि मुंबई मधील गोरेगाव फिल्म सिटी मध्ये शूट करण्यात आली होती आणि आता बिग बॉस मराठी सीजन 3 देखील मुंबई मध्ये शूट करण्यात येणार आहे. मागील दोन सीजन प्रमाणे बिग बॉस मराठी सीजन 3 च्या विजेत्याला ₹25 लाख हे बक्षीस देण्यात येणार आहे.

Bigg Boss Marathi Season 3 Rules

तर या वर्षीचा बिग बॉस मराठी सीजन 3 इतर सीजन पेक्षा थोडा वेगळा असणार आहे. या वर्षी तुम्हाला घरांमध्ये घडणाऱ्या घडामोडी 24 तास बघायला मिळणार आहेत. या वर्षीचा बिग बॉस मराठी चा सीजन 3 हा 24 तास लाईव्ह असणार आहे. त्यासाठी तुम्हाला Voot या एप्पचे मासिक किंवा वार्षिक सबस्क्रीप्शन घ्यावे लागेल. त्याचप्रमाणे बिग बॉस सीजन 14 सुद्धा लाईव्ह होता आणि बिग बॉस कन्नडा सुद्धा लाईव्ह होता.

त्यामुळे मराठीचा बिग बॉस लाईव्ह असेल त्याचप्रमाणे बिग बॉस चे मेकर्स जुलै महिन्याच्या सुरुवाती पासूनच सर्व कंटेस्टंटला कॉरेनटाईन करणार आहेत. त्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांची ही प्रोसेस हिंदीप्रमाणे मराठी मध्ये सुद्धा चालू असणार आहे. वाइल्ड कार्ड कंटेस्टंट घरामध्ये गेला तरी त्याला सुरुवातीला 14 दिवस कॉरेनटाईन करावे लागेल.

बिग बॉस मराठी 3 पर्व अंदाजे पुढच्या महिन्याच्या शेवटच्या हप्त्यांमध्ये चालू होण्याची शक्यता आहे. कारण यांना हा सीजन 3 महिन्यात संपवायचा आहे. त्यापुढे बिग बॉस चा पंधरावा सीजन सुद्धा सुरू होणारे आणि हो बिग बॉस मराठी 3 पर्वाचे कंटेस्टेंट लिस्ट आम्ही खाली दिली आहे.

Bigg Boss Marathi Season 3 Contestants List with Photo

समीर चौगुले

सोनी मराठी टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध मालिका महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कलाकार आणि लेखक समीर चौगुले यांनी आपल्या अभिनयाने तसेच उत्तम अशा कॉमेडी टाइमिंग ने वेगवेगळ्या सामाजिक विषयावरती स्किट च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादरीकरण केले. तसेच समीर चौगुले ने कायद्याचं बोला, आजचा दिवस माझा, वक्रतुंड महाकाय, अ पेईंग घोस्ट, मुंबई टाईम तसेच विकून टाक यासारख्या मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावली आहे याव्यतिरिक्त बॉलीवुड फिल्म मुंबई मेरी जान मध्ये देखील महत्त्वाची भूमिका निभावली.

रुपाली नंद

रूपाली नंद ही एक मराठी अभिनेत्री आहे जिल्हा आपण प्रसिद्ध मराठी फिल्म मुंबई पुणे मुंबई दोन या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या लहान बहिणीच्या भूमिकेत बघितलं आहे. तसेच मराठी टेलिव्हिजन स्टार प्रवाह वरील मालिका गोठ यामध्ये तिने प्रमुख भूमिका निभावली आहे तिने साकारलेल्या पात्राचे नाव होते नीला.

आनंद इंगळे

आनंद इंगळे हा एक उत्तम मराठी कलाकार आहे त्याने. आपल्या करिअरमध्ये अनेक मराठी नाटके चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून निरनिराळ्या भूमिका साकारल्या. अजब लग्नाची गजब गोष्ट, गोळाबेरीज, पोस्टर गर्ल, बालक पालक या सारख्या प्रसिद्ध मराठी फिल्म देखील त्याने महत्त्वाची भूमिका निभावली. या व्यतिरिक्त मराठी मालिका फु बाई फु, शेजारी शेजारी पक्के शेजारी, हम्मा लाईव्ह, आणि सध्या कलर्स मराठी वर प्रदर्शित होणारी ऑनलाइन या मालिकेत काम केले आहे.

अंशुमन विचारे

अंशुमन विचारे हा एक उत्तम कॉमेडी कलाकार आहे तसेच त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका देखील निभावली आहे. श्वास, भरत आला परत, वरात आली घरात, हंगामा, वेड लावी जीवा, मराठी पाऊल पडते पुढे, मिसळ पाव, पोस्टर बॉईज, धिंगाणा अशा चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. याव्यतिरिक्त सोनी मराठी टेलिव्हिजन वरील महाराष्ट्राची हास्य जत्रा, झी मराठीवरील फू बाई फू, आणि कलर्स मराठी वरील कॉमेडीची बुलेट ट्रेन यासारख्या मालिकांमधून निरनिराळ्या स्कीत्स करत त्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.

नेहा जोशी

नेहा जोशी या अभिनेत्रीने मराठी फिल्म झेंडा त्याचप्रमाणे पोस्टर बॉईज यासारख्या निरनिराळ्या विषयांवर आधारित असणाऱ्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप सोडली आहे. तिने मराठी सोबतच जब लव हुआ, बचके जरा भूत बंगले मे, हवाहवाई, वन नाईट आउट असा हिंदी चित्रपट देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. झी मराठीवरील का रे दुरावा या मालिकेत तिने रजनी हे पात्र साकारले आहे याव्यतिरिक्त नेहा जोशी अवघाची संसार मध्ये देखील झळकली होती.

ऋषी सक्सेना

ऋषी सक्सेना यांनी आपल्या करीयरची सुरुवात झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका काहे दिया परदेस मधून केली. या मालिकेत त्याने शिव कुमार शुकला ही भूमिका साकारली होती. या मालिकेतील त्याची मराठी अभिनेत्री सायली संजीव इने साकारलेली गौरी सोबत ची प्रेम कहाणी प्रेक्षकांना फारच आवडली.याव्यतिरिक्त त्याने रिंग आऊट या वेब सिरीज मध्ये देखील महत्वाची भूमिका साकारली आहे.

खुशबू तावडे

खुशबू तावडे हे एक उत्तम मराठी अभिनेत्री असून तिने अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये आपली महत्त्वाची भूमिका साकारली आहे एक मोहोर अबोल, मी मराठीवरील तू भेटशी नव्याने, साम टीव्हीवरील पारिजात, स्टार वन टेलिव्हिजन वरील प्यार की ये एक कहानी तसेच स्टार प्लस वरील तेरे लिये अशा अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच खुशबू ने लव फॅक्टर प्रेमाची ट्रायलॉजी या मराठी फिल्म मध्ये देखील आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप सोडली आहे.

प्रणीत हाटे

प्रणित हाटे या अभिनेतेला आपण कारभारी लयभारी या झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका मध्ये बघितलं असेल. ही अभिनेत्री जितकी सुंदर दिसायला आहे तितकीच सुंदर ती अभिनय देखील करते. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने आपला एक वेगळा प्रेक्षकवर्ग देखील निर्माण केलेला आहे.

शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकर ही एक सुंदर अशी मराठी अभिनेत्री तर आहेच त्यासोबतच ती एक उत्तम गायिका देखील आहे. शिवानी ने टाइमपास या प्रसिद्ध मराठी फिल्म मध्ये एक आईटम डान्स केलेला आहे. त्यासोबतच चमेली या मराठी फिल्म मध्ये देखील आइटम डान्स केला आहे. याव्यतिरिक्त हिंदीतून जोया, सोनिया आणि जाणा पटेल अशा वेगवेगळ्या फिल्मस मधून तिने आपल्या अभिनयाची उत्तम अशी छाप सोडली आहे.

आनंद काळे

आनंद काळे हा एक मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवर झळकणारा आणि आपली अभिनयाने एक वेगळी छाप सोडणारा असा उत्तम कलाकार आहे. त्याने स्वराज्य रक्षक संभाजी या झी मराठी वरील प्रसिद्ध मालिकेमध्ये कोंडाजी बाबा फर्झांड ही भूमिका साकारली आहे तसेच चार दिवस सासूचे या मराठी मालिकेत देखील महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

कमलाकर सातपुते

कमलाकर सातपुते यांनी कॉमेडी एक्सप्रेस सारख्या टेलिव्हिजन मालिकेतून प्रेक्षकांना हसवत आपल्या अभिनयाच्या निरनिराळ्या छटा प्रेक्षकांसमोर मांडल्या. त्यासोबतच ह्यांचा काही नेम नाही, गलगले निघाले, अजब लग्नाची गजब गोष्ट आणि शहाणपण देगा देवा सारख्या अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून तो अभिनय करत राहिला.

चिन्मय उदगीरकर

महाराष्ट्राचा सुपरस्टार या झी मराठी वरील प्रसिद्ध मालिकेतून चिन्मय ने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने श्यामचे वडील, वाजलाच पाहिजे, प्रेमवारी, मेकअप, वाजवू या बँड बाजा सारख्या मराठी फिल्म मध्ये अभिनय केले. तसेच स्टार प्रवाह वरील स्वप्नांच्या पलीकडे, महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार मध्ये अँकरिंग केली, याव्यतिरिक्त झी मराठीवरील नांदा सौख्यभरे, कलर्स मराठी वरील गाडगे अंड सून, सख्खे शेजारी आणि झी मराठी वरील अग बाई सासुबाई सारख्या मालिकेत अभिनय केले.

नक्षत्रा मेढेकर

माझिया माहेरा या कलर्स मराठी वरील प्रसिद्ध गीता मालिकेतून नक्षत्रांचे आपल्या करिअरची सुरुवात केली त्यानंतर तिने लेक माझी लाडकी या स्टार प्रवाह वरील मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली. त्यानंतर तिने चंद्र आहे साक्षीला या कलर्स मराठी वरील मालिकेत सुमन काळे नावाची खलनायकाची भूमिका साकारत तिने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाचा एक वेगळा पैलू दाखविला.

निशिगंधा वाड

निशिगंधा वाढ ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अभिनयाची सुरुवात अगदी लहानपणी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातून केली. याच बरोबर मराठी चित्रपट एका पेक्षा एक, प्रतिकार, बंधन, बाळा जो जो रे, वाजवा रे वाजवा, शेजारी शेजारी, सासर माहेर अशा अनेक चित्रपटात काम केले. त्या सोबतच तिने आप मुझे अच्छे लगने लगे, कर्म योद्धा, तुमको ना भुल पायेंगे, दादागिरी, दिवानगी अशा अनेक हिंदी चित्रपटात देखील काम केले.

सई रानडे

सई रानडे ही मराठी फिल्म आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने ई टीव्हीवरील मालिकेत कस्तुरी नावाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

पल्लवी सुभाष

पल्लवी ही एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक मराठी फिल्म, टेलिव्हिजन सिरियल्स आणि निरनिराळ्या विज्ञापना मधून अभिनय केले आहे.

शुभांकर तावडे

शुभांकर तावडे हा एक उत्तम अभिनेता आहे. त्याने दिल दोस्ती दुनियादारी या फिल्ममध्ये तरून हे पात्र साकारले आहे.

केतकी चितळे

केतकी चितळे ही एक चित्रपट सृष्टी तसेच टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील एक नावाजलेले नाव आहे. केतकीने मिस्टर आणि मिसेस सदाचारी या मराठी चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली तसेच आंबट गोड या स्टार प्रवाह वरील प्रसिद्ध मालिकेत तिने अबोली नावाची महत्वपूर्ण भूमिका साकारली. त्यानंतर तिने तुझं माझं ब्रेकप या या झी मराठी वरील प्रसिद्ध मालिकेत देखील अभिनय केले.

नम्रता सम्भेराव

नम्रता संभेराव ने आपल्या विनोदाचा अचूक टाइमिंग आणि एक्टिंग टॅलेंट च्या जोरावर अवघ्या महाराष्ट्राला पोट धरून हसण्याचे भाग पाडले. तिने आपल्या करिअरची सुरुवात महाराष्ट्राचा सुपरस्टार या रियालिटी शो पासून केली. त्यानंतर नम्रताने कळत नकळत, लज्जा, पुढचं पाऊल आणि बाप माणूस अशा अनेक मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. महाराष्ट्राची हास्य जत्रा या सोनी मराठी वरील प्रसिद्ध मालिकेतून नम्रता आपल्या प्रेक्षकांना भरपूर हसू येते आणि संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन करत आहे.

Bigg Boss Marathi Season 3 Contestants List: बिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे प्रवेश करणार आहेत अशी सध्या सर्वीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. सध्यातरी हि कलाकारांची दिलेली यादी फक्त एक अंदाज आहे आणि अंतिम कलाकारांची यादी बिग बॉस मराठी सीजन 3 शोच्या उद्घाटनाच्या एपिसोडमध्ये उघड होऊ शकेल. तोपर्यंत बिग बॉस मराठी सीझन 3 बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या संपर्कात नक्की रहा.

READ MORE

Watch Puncch Beat Season 2 Online ALT Balaji Web Series Episodes (2021)