Jeev-Majha-Guntala-Serial-Cast

Jeev Majha Guntala Serial Cast, Start Date, Story, Actors Wiki, Plot

Jeev Majha Guntala Serial: आपल्या सर्व मराठी प्रेक्षकांसाठी Colors मराठी हे नावाजलेले टेलीविजन चॅनल जे मुळातच प्रत्येक घराघरात खूप पोपुलर तर आहेच, तर हि वाहिनी सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी एक आगळी वेगळी अशी कथा घेऊन येत आहे जिचे नाव आहे Jeev Majha Guntala. तर आपल्याला ह्या मालिकेतील सर्व एक्टर्स विषयीची आणि मालिकेच्या कथे विषयी आपल्याला माहिती हवी असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.

Jeev Majha Guntala serial update

Advertisement
Title : Jeev Majha Guntala
Genres : Drama
Directed by : Update soon
Produced byUpdate soon
Release date : 21 June 2021
Telecast Time : 9:30 pm
Language : Marathi
Streaming on : Colors Marathi & Voot

Jeev Majha Guntala Marathi Seriel

आपल्या सर्वाना हे माहित असेलच कि सध्या आपल्या देशावर जे कोरोनाचे संकट ओढवले आहे त्याचा परिणाम टेलीविजन इंडस्ट्रीवर देखील झाला आहे आणि त्याचे परिणाम म्हणजेच या काळात बऱ्याच मालिकांची शुटींग देखील बंद करण्यात आली किव्वा काही मालिका तर चक्क बंद देखील पडल्या. तसेच काही मालिकांची शुटींग सध्या महाराष्ट्र बाहेर म्हणजेच गोवा आणि गुजरात सारख्या इतर राज्यात सुरु आहे. सरकार कडून आता बऱ्याच मालिकांचे शुटींग सुरु करण्याची परवानगी मिळाल्याने colors मराठी आपल्या भेटीला एक आगळी वेगळी आणि एक फ्रेश कहाणी घेऊन येत आहे जिचे नाव आहे Jeev Majha Guntala. हि मालिका आपल्या भेटीला जून महिन्यात येणार आहे.

Jeev Majha Guntala official Teaser

Colors मराठीने नुकताच Jeev Majha Guntala या नवीन मराठी मालिकेचा टीजर रिलीज केला आहे. तर या टीजर मध्ये दाखवले आहे कि एक रिक्षा जिच्या मागील बाजूने “चला वाट मोकळी करा” असे लिहिले आहे. तर हि रिक्षा कॉलेजमध्ये स्टूडेन्ट पार्किंग मध्ये येऊन थांबते. हे बघून कॉलेज मधील सेक्युरिटी या मुलीला अडवतो आणि त्या रिक्षा चालवत आलेल्या मुलीला रागात सांगतो कि “चला गेट च्या बाहेर.” त्यावर हि मुलगी त्या सिक्युरीटीला बोलते कि “अहो मामा” पण सिक्युरिटी तिचे काहीच ऐकून न घेता तिला बोलतो कि “हे बघा मामा नाय आणि काका नाय” हि पार्किंग फक्त कॉलेजच्या स्टूडेन्ट साठीच आहे. त्यामुळे हि रिक्षा लेगेच गेटच्या बाहेर घे. तर हि मुलगी आपल्या गळ्यात कॉलेजचा आयडी कार्ड घालते. हे बघून तो सिक्युरिटी आश्चर्यचकित होऊन तिला विचारतो “तुम्ही स्टूडेन्ट आहे का?”. त्यावर हि मुलगी आपला कॉलेजचा आयडी कार्ड दाखवत सिक्युरिटीला बोलते कि “अंतरा, नाव लक्षात असू द्या”. तसेच पुढे जाताना मध्येच गप्पा मारीत असलेल्या मुलींना हि मुलगी बोलते कि “अय, चला वाट मोकळी करा !”

Jeev Majha Guntala Cast with Biography

  • अंतरा: योगिता चव्हाण
  • सौरभ चौघुले

Jeev Majha Guntala Serial Story

Colors मराठीच्या Jeev Majha Guntala Serial ची कथा एका अशा मुलीच्या आसपास फिरते जी एकदम बिनधास्त आहे. हि मुलगी पूर्णपणे आत्मविश्वासाने भरलेली आहे. जिला आपल्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवावी लागते आणि ह्या कामाची तिला काहीच खंत वाटत नाही आणि वाटली देखील नाही पाहिजे. कारण आजच्या काळात कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणाला जर रिक्षा चालविण्यास सांगितली तर कदाचित त्याला संकोच वाटेल. पण हि मुलगी आपल्या परिवारासाठी हे काम अभिमानाने करीत आहे. या मालिकेत योगिता चव्हाण हि अभिनेत्री अंतरा हि भूमिका साकारीत आहे. जिला आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करायचे आहे त्यासोबतच आपल्या परीवारासाठी पैसे देखील कमवायचे आहे. जशी जशी या मालिकेची कहाणी पुढे जाईल तसे हि अभिनेत्री म्हणजेच “अंतरा” कोणाच्या तरी प्रेमात पडणार आहे. तसेच असा अंदाज आहे कि एकंदरीत तिची या मालिकेच्या कथेत दाखवलेली पार्श्वभूमी मुळे तिला निरनिराळ्या आव्हानांना सुद्धा समोर जावे लागणार आहे.

Jeev Majha Guntala Telecast Time

Colors मराठीच्या या प्रसिध्द वाहिनीवर Jeev Majha Guntala हि सिरीयल आपल्याला 21 June 2021 पासून सोमवार ते शनिवार रात्री 9.30 पाहायला मिळणार आहे.

अंतरा: योगिता चव्हाण Instagram Posts

Saorabh Rajnish Choughule

Read more post